शिंदे सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न सुरूच पण मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम, काय दिला इशारा?
VIDEO | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आठवा दिवस, शिंदे-फडणवीस सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू असतना मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम,शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा?
जालना, ५ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर आजपासून मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण अधिक कडक करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सरकारने दिलेल्या शब्दानुसार मनोज जरांगे पाटील यांनी पाणी ग्रहण करण्यास सुरूवात केली होती. मात्र अध्यादेश घेऊन आले नाही तर संध्याकाळी 5 नंतर मनोज जरांगे पाटील पाण्याचा त्याग करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची समजूत आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून वेळोवेळी केले जात असताना ते मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!

