Eknath Shinde | माझ्यासोबत 50 पेक्षा अधिक आमदार, एकनाथ शिंदेंचा दावा
आपल्याला 50 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आजच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या मात्र कमी होत आहे. आपल्याला 50 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीनंतरच पुढील रणनिती ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

