Eknath Shinde : दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका, एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा

काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 12, 2022 | 11:10 PM

मुंबई : बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण, आता शिंदे बंडासंदर्भात एकएक खुलासा करतात. जराही दगाफटका झाला असता तर शहीद होण्याची वेळ आली असती, असं शिंदे म्हणालेत. कुणी विचारही केला नव्हता, अशी फूट शिंदेंनी शिवसेनेत पाडली. 55 पैकी 40 आमदारांना आपल्या गटात आणलं. 40 पैकी एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडं परत गेला नाही. शिंदेंनी जे बंड पुकारलं ते यशस्वी झालं. प्रस्थापित लोकांपुढं बंड पुकारण्यात शिंदे यांना यश आलं आहे. पण, त्यावेळी काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें