AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता....

मोठी बातमी! ओमराजे आणि एकानाथ शिंदेंची तातडीची बैठक; धाराशिवबाबत सर्वात मोठा निर्णय, आता….

| Updated on: Jul 12, 2026 | 11:07 AM
Share

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काही आठवड्यांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

आता धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरातील पूजा व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन काही मुद्दे मांडल्याचे सांगितले जात आहे.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मंदिरातील सर्व कामकाज नियमानुसार आणि पारंपरिक पद्धतीने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Published on: Jul 12, 2026 11:06 AM

Follow Us