आनंदराव अडसूळ यांची भाजपला धमकी, ‘येत्या 8 दिवसांत दिलेला शब्द पूर्ण करा, अन्यथा…’
tv9 Marathi Special Report : राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण करा असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. अन्यथा नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढणार? असं देखील अडसुळांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपला धमकी दिली आहे. ८ दिवसांत राज्यपालपदाचा निर्णय न घेतल्यास नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार, असं आनंदराव अडसुळांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या ८ दिवसांत भाजपने राज्यपालपदाचा दिलेला शब्द पाळला नाही तर नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असल्याचा गंभीर इशारा आनंदराव अडसुळांनी दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आनंदराव अडसुळांनी ज्या नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावरून इशारा दिलाय ते प्रकरण नेमंक काय? नवनीत राणांनी २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवली होती. यावेळी राणांनी आनंदराव अडसुळांचा पराभव केला. दरम्यान, त्यानंतर अडसुळांनी राणांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. काय केला होता आनंदराव अडसुळांनी राणांवर आरोप बघा स्पेशल रिपोर्ट?