VIDEO : CM Eknath Shinde | ‘दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही’
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दाैऱ्यावर आहेत. मात्र, 'दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही' असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत आपल्यासोबत 40 आमदार घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दाैऱ्यावर आहेत. मात्र, ‘दिल्ली दौरा आणि मंत्रिमंडळाचा काही संबंध नाही’ असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत आपल्यासोबत 40 आमदार घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. आता एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहे. आता राज्यात लवकर मंत्री मंडळ विस्तार केला जाणार असून यामुळे मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दाैरा महत्वाचा मानला जातोयं. शनिवार आणि रविवारी नवी दिल्लीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल दाखल होत आहेत. आज दुपारी साडे चार वाजता पंतप्रधानांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक राष्ट्रपती भवनात होणार आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

