अजितदादा… धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात अन् नैतिकतेवरून थेट सवाल
विरोधकांनी आतापर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. पण आता अजित पवार यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत शिरसाटांनी दुहेरी भूमिका नको असं म्हंटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांनाच अधिकार आहे अशी रोखठोक भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी नैतिकतेवरून काय करायचं? हे मुंडेंनीच ठरवावं असं सूचकपणे सांगितलं. हे सांगताना त्यांनी स्वतःच्याच सिंचन घोटाळ्यामधील आरोपावेळी दिलेल्या राजीनाम्याचा दाखलाही दिला. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेने रोखठोक भूमिका घेतली. दोन भूमिका घेऊन चालणार नाही. कोणाला मंत्री करायचं, कुणाचा राजीनामा घ्यायचा, हे अधिकार अजित पवार यांचेच आहेत, असं मंत्री शिरसाट यांनी म्हंटलंय. म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाजूने शिंदे यांची शिवसेना आहे हे स्पष्ट दिसतंय. दोन भूमिका नको असं म्हणत अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवावं अशी धडकपणे भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली. तर भाजपनं धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित दादांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपनं बॉल अजित पवारांच्या कोर्टात टाकलाय. दरम्यान, सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवारांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तोच धागा पकडत पत्रकारांनी नैतिकतेवरून धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा प्रश्न केला. यावरून दादांनी जे उत्तर दिलं त्यावरून काही प्रश्न निर्माण होताहेत. नैतिकतेवरून राजीनामा द्यायचा की नाही हे मुंडेंनी बघावं हे दादांनी ठरवलं का? मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार स्वतःहून घेणार नाहीत का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ठोस भूमिका घेण्यास अजित पवारांनी मुंडेंवरून हात वर केलेत का?

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
