Ajit Pawar Video : ‘… ते धनंजय मुंडे यांनांच विचारा’, राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादांचं मोठं वक्तव्य
नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही? हा प्रश्न तुम्ही त्यांना म्हणजे धनंजय मुंडेंनाच विचारा असे भुवया उंचावणारे विधान अजित पवारांनी केले आहे. धस-मुंडे भेटीच्या वादाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले आणि या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिल्यात...?
नैतिकतेच्या दृष्टीने जर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात अजित पवारांनी कधी काळी राजीनामा दिला होता तर त्याच न्यायाने धनंजय मुंडे का राजीनामा देत नाहीत यावर हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडेंनाच विचारा असे भुवया उंचावणारे विधान अजित पवारांनी केलंय. एकिकडे भाजप नेते सुरेश धस मुंडेंच्या राजीनाम्यावर म्हणताहेत की राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आहे, कारण धनंजय मुंडे अजित पवारांच्या पक्षाचे नेते आहेत पण अजित पवारांनी याच्यात पक्षाचा काहीही संबंध येत नसल्याचे उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे मुंडे आणि कराड संबंधावरचे पुरावे एसआयटीने कोर्टाला दिले आहेत असा प्रश्न केल्यावर अजित पवारांनी तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का असं म्हणत मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं. भाजपने केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा का दिला? या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिलं की जो तो स्वतःचा निर्णय घेतो त्यावेळी माझ्या बुद्धीला जे वाटलं ते मी केलं कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलं होतं. नैतिकतेच्या मुद्द्यावरून याआधी काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाणांसहित अनेक नेत्यांनी राजीनामे दिले होते. मात्र आरोप भाजपने केलेले असूनही काँग्रेस नेत्यांना बदनाम करून राजीनामे घेतले असा दावा अशोक चव्हाण करत आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

