Bhaskar Jadhav Video : ‘… असं बोललोच नाही’, भास्कर जाधव यांच्या मनात चाललंय तरी काय? आधी नाराजी मग सारवासारव
ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतरही काही नेते उपस्थित होते. पण भास्कर जाधव या बैठकीला नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या.
‘ठाकरेंच्या शिवसेनेत संधी मिळाली नाही असं मी म्हटलंच नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला क्षमतेनुसार संधी मिळाली नाही असं बोललो होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं नव्हतं’, असं भास्कर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चेनंतर अखेर भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी भास्कर जाधवांनाही पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. यानंतर भास्कर जाधवांनीही आपल्याला क्षमतेनुसार संधी मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली. यावरून भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे भास्कर जाधवांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. ‘माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला अडवं आलेलंच आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. त्याची कारणे अनेक आहेत. अडचणी अनेक येतात’, असं वक्तव्य करत भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्ती केली होती. तर आज स्पष्टीकरण देताना माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या ४३ वर्षांमध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कुणीही दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही की हे केवळ माझ्याच वाट्याला आलेला असाताला भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत उघडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार

'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
