Bhaskar Jadhav Video : नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, ‘मी स्प्ष्ट भूमिका घेणारा माणूस पण ही वस्तुस्थिती…’
'मी कधी नौटंकी केली नाही, मी कधीच नाटक केले नाही. रडत बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबाने, नाही मिळालं तर नशिबाने. मी कुठलंही पद मिळवण्यासाठी नाटक केले नाही', असं भास्कर जाधव म्हणाले.
ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसताय. अशातच भास्कर जाधव यांनी क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याचे वक्तव्य केलंय. त्यामुळे आता भास्कर जाधव नाराज आहे का? अशा नव्या चर्चा सुरू झाल्यात मात्र आता भास्कर जाधव यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी कोणाकडे जाणार असल्या चर्चा सुरू आहे. माझ्या आयुष्यात कुठलंही पद मिळवण्यासाठी मी कधीही नौटंकी केली नाही. आता माझ्या आयुष्यातील राजकीय वर्ष तरी किती राहली. जे मी आधी नाही केलं ते आता का करेन. त्यामुळे माझ्या मनाला काही लागलं असेल तर मी हे पद मिळवण्यासाठी करतो. अशीच स्टंटबाजी केली आणि गटनेतेपद पदरात पाडून घेतलं. मला माझ्या गेल्या ४३ वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे.’, असं भास्कर जाधव म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘मला माझ्या क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. हे केवळ माझ्याच वाटेला आलं असं नाही, असा भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं. हे माझं दुर्देव आहे. हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला’, असं भास्कर जाधव म्हणाले.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
