Eknath Shinde : बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा ठाकरेंच्या सेनेला टोला
Shivsena Shinde Group : आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा वरळीतील एनएससीआय डोम येथे सुरू आहे.
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण विचार सोडले नाहीत. विचारांसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली. तर दुसरीकडे, बाळासाहेबांचे वारसदार म्हणणारे त्यांच्या विचारांना धुळीस मिळवले. बाळासाहेब असते तर त्यांना मिरचीची धूर दिली असती, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सेनेवर केली आहे. आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा वरळीतील एनएससीआय डोम येथे सुरू आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. शिवसेना म्हणजे वज्रमूठ, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना म्हणजे प्राण आहे. बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला. शिवसेनेचं नाव आपण जपलं. त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे, असंही शिंदेंनी यावेळी म्हंटलं.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे आत्मविश्वास आहे तर त्यांच्याकडे अहंकार आहे. आत्मविशावास आपल्याला विकासाकडे नेतोय आणि त्यांचा अहंकार त्यांना विनाशाकडे घेऊन जात असल्याचे आपणास दिसतेय. काँग्रेस दावणीला शिवसेना बांधण्याचे पाप कुणी केले, हे आपल्याला माहिती आहे. सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कंबरेचे लोक्याला गुंडाळले. शिवसेनेच्या मतदारांशी, बाळासाहेबांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी विश्वासघात केला.सरडा रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील महाराष्ट्राने पाहिलाय, हे मी नाही तर त्यांचेच सगेसोयरे आणि भाऊबंद सांगत आहेत, अशी खोचक टीका देखील यावेळी शिंदेंनी केली आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
