Breaking | ST बसची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापना

एसटी महामंडळाची आर्थिक सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेलीय. परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

कोरोनामुळे एसटी महामंडळाचं कंबरडं मोडलं आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाची आर्थिक सुधारण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेलीय. परिवहन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे या समितीचे सदस्य असणार आहेत. एसटी महामंडळाला आर्थिक गर्तेतून काढण्यासाठी आता ही समिती अभ्यास करेल आणि आपला अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI