AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं

तब्बल 24 तास उलटले, तरी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं

| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 9:14 AM
Share

यशवंत जाधव यांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण सध्या अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई – काल सकाळी शिवसेना (shivsena) नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरू केली, ती अद्याप तशीचं सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या छापेमारीला आता 24 तास उलटून गेले आहेत. तरी सुध्दा त्यांची चौकशी सुरू असल्याने आयकर विभागाच्या हाती नेमकं काय सापडलं असेल अशी अनेकांना शंका आहे. त्याचबरोबर आयकर विभागाकडून अद्याप कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सगळं प्रकरण गुलदस्त्यात असल्याचं समजतंय. माझगाव येथील यशवंत जाधव यांच्या अनेक शिवसैनिकांनी ठिय्या धरला असून तिथं अधिक पोलिस (mumbai police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय सुरू आहे याची जराशी कुणकुण देखील कुणाला नाही. यशवंत जाधव यांनी परदेशात पैसा लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण सध्या अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे.