Indain Army : पाकिस्तानची मस्ती काय उतरेना… भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे अन् सोशल मीडियावर…
अपप्रचार केल्यानं पाकिस्तानी पत्रकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान ISPR आणि ISI संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर ही बंदीची कारवाई करण्यात आली होती.
पाकिस्तानच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर भारतीय लष्कराबाबत खोटे दावे केले जात आहे. भारतीय लष्करात निवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याला पदावरून काढून टाकलं अशा पोस्ट केल्या जात आहे. नॉदर्न कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार यांच्याबाबत पाक सर्मथकांनी खोटे दावे केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम घटनेनंतर नॉदर्न कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार यांना पदावरून काढल्याचा खोटा दावा पाकिस्तानकडून समोर आला आहे. दरम्यान, भारतीय लष्करातून नॉदर्न कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार हे आज निवृत्त होत असल्याची माहिती आहे.
तर भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असताना पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सीविरोधात केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आहे. भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करणं पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सींला चांगलंच भोवलं असून दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

