India Ban Pakistani X Page : पाकिस्तानी पत्रकारांवर मोठी कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पहलगाम हल्ल्याच्या काही तासांतच, बनावट बातम्या, माहिती आणि अप्रचार करण्यासाठी विविध सोशल मीडिया हँडलवरून काही व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. हा अप्रचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पाऊलं उचलली आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. अशातच पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सीविरोधात केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय लष्कर आणि सरकारविरोधात सातत्याने अपप्रचार करणं पाकिस्तानी पत्रकार आणि काही पीआर एजन्सींना चांगलंच महागात पडलं आहे. कारणं पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती.
अपप्रचार केल्यानं पाकिस्तानी पत्रकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान ISPR आणि ISI संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर संदर्भात खोट्या बातम्या आणि अपप्रचार केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. यासोबत आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या एक्स अर्थात ट्वीटरवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच भारत सरकारने अनेक पाकिस्तानी पत्रकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही बंदी घातली आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

