Shirur | आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्या एका संशयित वाहनाला पोलिसांनी अडवून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित वाहनाचा कोणत्याही आमदाराशी अथवा लोकप्रतिनिधीशी कोणताही संबंध नसल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर परिसरात पोलिसांकडून नियमित नाकाबंदी सुरू होती. यावेळी एका चारचाकी वाहनावर आमदारांचे स्टिकर लावलेले दिसून आल्याने पोलिसांनी वाहन थांबवत चालकाची चौकशी केली. सुरुवातीला चालकाने स्वतःचा संबंध राजकीय व्यक्तींशी असल्याचा दावा केला. मात्र कागदपत्रांची पडताळणी आणि अधिक चौकशीनंतर वाहनावरील स्टिकर बनावट असल्याचं उघड झालं.
या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित वाहन चालकाविरोधात कारवाई सुरू केली असून अशा प्रकारे खोटे स्टिकर वापरून सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
Published on: May 26, 2026 05:07 PM
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप