AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Nashikमध्ये महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक -tv9

Special Report | Nashikमध्ये महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक -tv9

| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 9:25 PM
Share

कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केल्याने जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे (Farmer) शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनीधीचे.

नाशिक : कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केल्याने जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे (Farmer) शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनीधीचे. परंतू, वीजपुरवठा खंडीत केल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला होता. गेल्या पाच दिवसांपासून हीच अवस्था असल्याने याकडे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान तर होत आहे. शिवाय पाण्याविना जनावरांचे हाल पाहवत नसल्याने आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याने चक्क महवितरणच्या टॉवरवरच गळफास घेऊन (Farmer suicides) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या दरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसांगअवधान दाखविल्याने दुर्घटना टळलेली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून सय्यद पिंप्री येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने बबन ढिकले याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Published on: Jan 30, 2022 09:24 PM