VIDEO : Fast News | 12.30 PM | महत्वाच्या बातम्या | 30 March 2022
भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनीही ही भेट झाल्याचं सांगतानाच या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगून राजकीय हवाबाजीला हवा दिली आहे. वरुण गांधी हे नक्कीच ते माझ्याकडे आले होते. बरेच दिवस भेटीसंदर्भात वेळ मागे पुढे होत होती.
भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनीही ही भेट झाल्याचं सांगतानाच या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगून राजकीय हवाबाजीला हवा दिली आहे. वरुण गांधी हे नक्कीच ते माझ्याकडे आले होते. बरेच दिवस भेटीसंदर्भात वेळ मागे पुढे होत होती. ते एका राजकीय पक्षाचे नेते असले, खासदार असले आणि गांधी कुटुंबाशी संबंधित असले तरी ती सदिच्छा भेट होती. कोणत्याही भेटीत राजकीय विषय निघत असतात. तसा या भेटीतही निघाला. पण ही भेट सदिच्छा भेटच होती, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच या पुढेही आम्ही एकमेकांना भेटणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
Follow Us
Latest Videos
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ

