VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 23 August 2021
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. देशमुखांचे माजी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. देशमुखांचे माजी पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. पालांडे आणि शिंदे सुरुवातीला ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांना अटक करून आता 60 दिवस होत आहेत. ईडीच्या कायद्यानुसार 60 दिवसात आरोपपत्र दाखल करायचं असतं. त्यानुसार पालांडे आणि शिंदे यांना अटक करुन आज 60 दिवस होत आहेत.
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

