सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की… FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर मोठी कारवाई केली आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात तपास आणि धाडींचा वेग वाढला आहे. दूध भेसळीनंतर आता खाद्यतेल उद्योगावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील 2 ऑईल रिपॅकिंग युनिट्सवर छापे टाकले. या कारवाईत तब्बल 2 कोटी 93 लाख 35 हजार 603 रुपयांचा संशयित निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात पाम तेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल आणि अज्ञात वनस्पती तेलाचा समावेश आहे.
तपासादरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. अस्वच्छ वातावरणात तेलाचे पॅकिंग, वापरलेले डबे पुन्हा वापरणे, फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव आणि प्रयोगशाळेशिवाय उत्पादन प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
Published on: Jul 13, 2026 04:40 PM
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना