Thane | शाहू विद्यालयाच्या मैदानात शालेय विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एकाची चाकू भोसकून हत्या

क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या या भांडणाचे रुपांतर नंतर थेट हामाणारीमध्ये झाले. हे भांडण नंतर एवढे वाढले की यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पोटात थेट चाकू खुपसण्यात आला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील राजीव गांधी परिसरात विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. शाहू विद्यालय येथील मैदानात हे भांडण झाले असून यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चोकूने भोसकण्यात आले आहे. या गंभीर हल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. तसेच दोघांना अटक करण्यात आले असून मुख्य संशयित फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे इस्टेट येथे राजीव गांधी परिसरात शाहू विद्यालय येथे काही विद्यार्थी जमले होते. त्यांच्यामध्ये अचानकपणे भांडण सुरु झाले. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या या भांडणाचे रुपांतर नंतर थेट हामाणारीमध्ये झाले. हे भांडण नंतर एवढे वाढले की यामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पोटात थेट चाकू खुपसण्यात आला. या हल्ल्यात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन संशयितांना ताब्यात घेतलं. तर मुख्य आरोपी फरार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI