Video : राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल, स्वागत रॅली प्रकरणी कारवाई

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल छत्तीस दिवसांनंतर काल अमरावतीत दाखल झाले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस काही चुकले नाही. राज्य सरकार वर्सेस राणा दाम्पत्य असा हा सामना आहे. अशा कितीतरी रॅली (Rally) निघत असतात. पोलिसांना माहीत असते. पण, ते कारवाई करत नाही. मात्र, राणा दाम्पत्य राज्य सरकारवर टीका करत असल्यानं सूडबुद्धीनं त्यांच्यावर पोलीस कारवाई […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 29, 2022 | 3:59 PM

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल छत्तीस दिवसांनंतर काल अमरावतीत दाखल झाले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यास पोलीस काही चुकले नाही. राज्य सरकार वर्सेस राणा दाम्पत्य असा हा सामना आहे. अशा कितीतरी रॅली (Rally) निघत असतात. पोलिसांना माहीत असते. पण, ते कारवाई करत नाही. मात्र, राणा दाम्पत्य राज्य सरकारवर टीका करत असल्यानं सूडबुद्धीनं त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत, हे या प्रकरणावर स्पष्ट होते. राणा दाम्पत्याला विनापरवानगी स्वागत रॅली काढणे भोवले. दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांसह शंभरपेक्षा अधिक युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गाडगेनगर पोलिसात (Gadgenegar Police) गुन्हा दाखल झालेत. राजापेठ पोलीस स्टेशनमध्येही (Rajapeth Police Station) राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें