Kurla Fire In Mall : कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Kurla Phoenix Mall : कुर्ला येथे असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये फूड प्लाझाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं जात आहे.
कुर्ल्यात फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरला. त्यामुळे मॉलमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मॉलमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागल्यानंतरचे आतील दृश्य आता समोर आले आहे. त्यावरून परिस्थितीचा अंदाज लावला जात आहे. या घटनेत कोणालाही काहीही दुखापत झालेली नसली तरी सतर्कता म्हणून मॉल रिकामा करण्यात येत आहे.
Published on: Apr 03, 2025 11:37 PM
Follow Us
Latest Videos
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
