अहमदनगरमध्ये सरफेस कोटिंग ऑइल कंपनीला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दत्तनगर एमआयडीसी परिसरातील सरफेस कोटिंग (Surface Coating) ऑईल कंपनीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइलचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दत्तनगर एमआयडीसी परिसरातील सरफेस कोटिंग (Surface Coating) ऑईल कंपनीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइलचा साठा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर, लोणी, राहाता, अशोक नगर भागातील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केले. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत फोमचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

