Parth Pawar Land Deal : अजितदादांच्या मुलाला मोठा दणका, ‘त्या’ जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपडेट, अमेडीया कंपनीला…
पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमिडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे. जमीन खरेदी व्यवहारात केवळ ₹५०० मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप आहे, तर नियमानुसार सुमारे ₹६ कोटी अपेक्षित होते. ही नोटीस बजावल्यामुळे आता अमिडिया कंपनीला उर्वरित शुल्क भरावे लागणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमिडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार, कंपनीने एका जमीन खरेदी व्यवहारासाठी केवळ ₹५०० मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप आहे. वास्तविक पाहता, २ टक्के दराप्रमाणे अंदाजे ₹६ कोटी मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित होते.
अंबादास दानवे यांनी याबाबत आरोप केले होते. या आरोपानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमिडिया कंपनीला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. कंपनीने मुद्रांक शुल्क विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. या नोटिसीनुसार, अमिडिया कंपनीला तात्काळ उर्वरित ₹६ कोटी शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

