Parth Pawar Land Deal : सर्व नियम गुंडाळले? अजितदादांच्या मुलाची जमीन खरेदी वादात, दानवेंचा थेट सरकारवर निशाणा
अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारावर सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटले की, पार्थ पवारांसाठी नियम बाजूला ठेवले गेले. १८०० कोटींच्या जमिनीचे ३०० कोटी मूल्यांकन कसे झाले आणि मुद्रांक शुल्क का भरले नाही, यावर दानवे यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहारावरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवार यांनी कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे म्हटले असले तरी, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार, पार्थ पवारांसाठी सर्व नियम गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. भूसंपादन झालेली जमीन परत कशी मिळू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीही त्यांना परत मिळतील का, असा सवाल त्यांनी केला. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी असलेली जमीन पार्थ पवार किंवा त्यांच्या कंपनीला कशी दिली गेली, याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. १८०० कोटी रुपयांच्या जमिनीचे मूल्यांकन ३०० कोटी कसे झाले आणि त्यासाठी मुद्रांक शुल्क का भरले नाही, असे प्रश्न दानवे यांनी विचारले. या संपूर्ण प्रकरणावर पार्थ पवार यांनी खुलासा करावा आणि त्यांनी कोणते नियम पाळले हे सांगावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

