Ahmedabad Plane Crash : …असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू, अॅम्ब्युलन्सला पहिला कॉल अन्…
Boeing 787 Dreamliner AI171 च्या 11A या सीटवरील रमेश चमत्कारीकरित्या बचावले. ते ब्रिटिश नागरिक आहेत. कुटुंबियांना भेटण्यासाठी ते 45 वर्षीय भाऊ अजय कुमार रमेश याच्यासह भारतात आले होते.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अॅम्बुलन्स सर्विसला करण्यात आलेला पहिला कॉल समोर आला आहे. दुर्घटनेनंतर परिसरातील अॅम्बुलन्स कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. तर एकमेव जिवंत असलेल्या जीवंत रमेश विश्वास कुमारला या टीमने रेक्यू केलं.
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेमागील तपास सुरू आहे. तर विमान अपघातामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र अपघातातील एकमेव बचावलेला प्रवासी रमेश विश्वास कुमार याची चांगलीच चर्चा होतेय. या प्रवाशाचं दैव बलवत्तर म्हणून आज त्याचा जीव बचावलाय. रमेश विश्वास कुमार याने अपघाताच्यावेळी विमानातून उडी मारली म्हणून त्याचा जीव वाचला अशी चर्चा असताना आज त्याने अपघात झाला त्यावेळी ते सीटसह बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे जीव वाचल्याचे सांगितले.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

