Omicron Breaking | कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता गुजरातमध्येही शिरकाव केला आहे. गुजरातमधील जामगनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या 11 लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता गुजरातमध्येही शिरकाव केला आहे. गुजरातमधील जामगनरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी परदेशातून गुजरातमध्ये आलेल्या 11 लोकांना आरटीपीआरनंतर क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी एका 72 वर्षीय व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याचे स्वॅब ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. 72 तासानंतर या व्यक्तीचा अहवाल आल्यानंतर त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीत 500 लोककांची ट्रॅव्हल हिस्ट्री

गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम सुरू आहे. यासाठी परदेशातून अनेक लोक येत आहेत. तसेच गुजरातमध्ये दिवाळीत 500 लोकांची ट्रॅव्हल हिस्ट्री राहिली आहे. सोमवार-मंगळवारी चार जिल्ह्यात विदेशातून 220 प्रवासी आले आहेत. तर गुरुवारी दुपारी एकाच दिवसात 14 हायरिस्क देशातून आणखी 2 हजार 235 लोक गुजरातला आले होते. त्यातील 2 हजार 228 प्रवासी अहमदाबाद आणि सूरत एअरपोर्टचे होते. दरम्यान गुजरातमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI