Vijay Wadettiwar | OBC आरक्षणाचा प्रश्न राजीनामा देऊन सुटत असेल तर देईन : विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार केलाआहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI