इट्स चॅप्टर इस ओव्हर अब… भाजपात प्रवेश करण्याआधी अशोक चव्हाण स्पष्टच म्हणाले
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः या पक्ष प्रवेशाची माहिती दिल्याने सुरू असणाऱ्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय. चव्हाण म्हणाले, आज माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरूवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे.
मुंबई, १३ फेब्रुवारी, २०२४ : काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आज अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः या पक्ष प्रवेशाची माहिती दिल्याने सुरू असणाऱ्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय. भाजपमधील प्रवेशाआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आज माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरूवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे. दुपारी बारा साडेबारा वाजेच्या सुमारात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखऱ बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत माझा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी काही जिल्ह्यातील संभाव्य लोकं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता ही त्यांनी वर्तविली तर ‘मी कोणालाही बोलावलेलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटलं. तर काँग्रेसबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘तो चॅप्टर ओव्हर झालाय. मी नवीन सुरुवात करत असल्याचे त्यांनी म्हटले.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार

