Mahadev Jankar : ‘…म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर’; EVM संदर्भात महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य
हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असताना विरोधकांनी समोर आलेल्या निकालावर आणि ईव्हीएमवर वारंवार संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजप महायुतीच्या विजयावर भाष्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला तर महाविकास आघाडीला मोजक्याच जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असताना विरोधकांनी समोर आलेल्या निकालावर आणि ईव्हीएमवर वारंवार संशय व्यक्त केला जात आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजप महायुतीच्या विजयावर भाष्य केले आहे. महादेव जानकर पुढे असेही म्हणाले, ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

