Tushar Bhosale | जन्माष्ठमीपासून सर्व प्रमुख नेते मंदिरांबाहेर आंदोलन करणार, : तुषार भोसले

राज्य सरकारने मंदिरावरील निर्बंध अजूनही हटविलेले नाही. त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत जन्माष्ठमीपासून सर्व प्रमुख नेते मंदिरांबाहेर आंदोलन करणार असल्याचं भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Aug 26, 2021 | 3:35 PM

राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभाही देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे आदेश दिले. पण या सर्वांमध्ये मंदिरावरील निर्बंध कमी करण्याबाबत कोणतेच आदेश दिलेले नाही. अजूनपर्यंत मंदिरांवरी निर्बंध हटविलेले नाही. त्यामुळे भाजपा अध्यात्मिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजपा अध्यात्मिक आघाडीने जन्माष्ठमीपासून मंदिरांबाहेर आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.  भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. जन्माष्ठमीपासून सर्व प्रमुख नेते मंदिरांबाहेर आंदोलन करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें