AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

| Updated on: Dec 27, 2024 | 8:15 AM
Share

देशातील ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या 92 व्या वर्षी गुरूवारी रात्री (26 डिसेंबर) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. यामुळे सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका लावणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र अखेर रात्री 10 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

देशातील ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहील, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Published on: Dec 27, 2024 08:03 AM