Sidharth Shukla | मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार

सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला होता. यावेळी अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले होते, सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली होती.

मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला होता. यावेळी अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले होते, सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला आली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI