Kalyan | कल्याणमधील गांधारी पूल वाहतुकीसाठी खुला

कल्याणमधील पडघा मार्गावरील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गांधारी पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आलीये. सोमवारी रात्री हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुलाच्या पिलरला तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे सांगत पीडब्युडीने हा पूल बंद केला होता.

कल्याणमधील पडघा मार्गावरील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गांधारी पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आलीये. सोमवारी रात्री हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुलाच्या पिलरला तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे सांगत पीडब्युडीने हा पूल बंद केला होता. मंगळवारी पीडब्युडीच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी पुलाला कोणतेही तडे गेले नसल्याचं समोर आले आणि त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI