Ganesh Chaturthi 2022: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे पहिलेच गणेशोत्सव आहे.
आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे पहिलेच गणेशोत्सव आहे. संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबियांसोबत गणेशाची प्रतिष्ठापना केली. देशासमोरचे आणि राज्यासमोरचे विघ्न दूर होऊ दे असे साकडे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गणरायाला घातले.
Published on: Aug 31, 2022 02:21 PM
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
