Ganesh Chaturthi 2023 | कल्याण-ठाकुर्लीतील बाप्पांचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून, पण का?
VIDEO | जीव धोक्यात घालून भाविकांकडून गणेश विसर्जन, कल्याण-डोंबिवली मधील ठाकुर्ली परिसर 90 फिट रोड कचोरे, खंबाल पाडा परिसरातील भाविकांनी दिला गणपती बाप्पांना रेल्वे रूळ ओलांडून निरोप
कल्याण, २४ सप्टेंबर २०२३ | गणेश चतुर्थीपासून मनोभावे पूजा-अर्चा करून शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. कल्याण-डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ठाकुर्ली परिसर 90 फिट रोड कचोरे, खंबाल पाडा परिसरातील भाविकांच्या बाप्पांना यंदा देखील रेल्वे रूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागत आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने या परिसरात विसजर्नासाठी कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करुन दिल्यानंतरही गणेश विसजर्नासाठी गणेश भक्त हे रेल्वे रुळ पार करुन कल्याण खाडीत विसर्जन करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले. गणेश भक्तांचा धोकादायक प्रवास पाहून या ठिकाणी सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वे पोलीस, सुरक्षा बल, स्थानिक पोलीस, स्थानिक सागरदेवी सेवक मंडळच्या मदतीने गणेश भक्तांनी आपले विसर्जन पार पडल्याचे पाहायला मिळाले.

