Ganesh Chaturthi 2023 | राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्…
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे मनोभाव दर्शन घेतले. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या.
मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज राज्यभरात सात दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. दरम्यान, आज गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट दिल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांनी वर्षा या बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांना श्री गणेशाची मनमोहक मूर्ती भेट म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तर यानिमित्ताने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्याचे शिंदे यांनी म्हटले. यावेळी शिंदे यांची सून वृषाली श्रीकांत शिंदे आणि राज ठाकरे यांचे काही सहकारी देखील सोबत उपस्थित होते.
Published on: Sep 25, 2023 03:23 PM
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
