Gautami Patil : कार्यक्रमाला येत असाल तर प्लीज… गौतमी पाटील हिनं प्रेक्षकांपुढे जोडले हात अन्.., वर्ध्यातील ‘त्या’ घटनेवर नाराज
वर्धा येथे घडलेली ही घटना सध्या स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे. ही संपूर्ण घटना वर्धा येथील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात झाली असून जिथे प्रेक्षकांनी खुर्च्या फेकून कार्यक्रमाची शिस्त बिघडवली आणि एक प्रकारचा असंतोष व्यक्त केला. यावर गौतमीने काय केलं आवाहन?
वर्धा येथे प्रसिद्ध कलाकार गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी खुर्च्या फेकल्याने परिसरात अचानक अशांतता निर्माण झाली होती. गौतमी पाटील यांच्या सादरीकरणासाठी वर्ध्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले होते. त्यांच्या नृत्याचा आनंद घेण्यासाठी आलेले हे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाच्या शांततापूर्ण वातावरणात व्यत्यय येत, अनपेक्षितपणे गोंधळाची परिस्थिती उद्भवली. या गोंधळात प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केली. यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे विस्कळीत झाले आणि उपस्थितीत नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
या घटनेमुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अन्य प्रेक्षकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या प्रकारावरच गौतमी पाटीलनं हात जोडून प्रेक्षकांना विनंती केली आहे. गौतमी पाटीलने तिच्या कार्यक्रमांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातला होता. या पार्श्वभूमीवर तिने प्रेक्षकांना विनंती केली आहे की, कला बघायला येत असाल, तर कृपया शांततेत कार्यक्रम बघा. गडबड गोंधळ करायचा असेल, तर असे करू नका किंवा येऊच नका. कार्यक्रमाला आले असाल, तर व्यवस्थित कार्यक्रम पार पडू द्या, असे आवाहन तिने केले.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

