AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...

नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क…

| Updated on: Aug 16, 2026 | 1:45 PM
Share

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर आता या मेळ्याची पुस्तिकदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुस्तिकेवरील फोटोंनी सध्या अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत. नेमकं काय घडलं?

सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री गिरीश महाजनांचाही फोटो असून, त्याखाली त्यांचा थेट पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा स्पष्ट उल्लेख आहे.

काही दिवसांपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आय व्यू एंटरप्रायझेस प्रकाशित या सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे प्रकाशन झाले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. पुस्तिकेच्या मागील बाजूसही गिरीश महाजन यांचा पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री असाच उल्लेख दिसून येत आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे. आता कुंभपर्व पुस्तिकेत थेट पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने गिरीश महाजन यांच्या नावाची ही चर्चा पुन्हा एकदा जोरदारपणे सुरू झाली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाला वेगळंच वळण येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Aug 16, 2026 01:45 PM

Follow Us