Chandrakant Patil: दिल्लीत जा, मसनात जा, कुठेही जा पण ओबीसी आरक्षण द्या- चंद्रकांत पाटील

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने(BJP) मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली.

प्राजक्ता ढेकळे

|

May 25, 2022 | 5:20 PM

मुंबई – दिल्लीत जा , मसनात जा, कुठेही जा पण ओबीसी आरक्षण (OBC reservation)द्या. कश्यासाठी राजकारणात जाता, घरी जावा घरी , घरी जाऊन स्वयंपाक करा. तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते माहित नाही. तुम्हाला एका शिष्टमंडळ पाठवता येत नाही. तुमची आता घरी जाण्याची वेळा झाली आहे. असे म्हणत आमदार चंद्रकांत पाटील(chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने(BJP) मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें