Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता नाशिक जिल्ह्यालाही बसू लागला असून, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले असून, नाशिक शहरातील दुतोंड्या मारुती मंदिराच्या पायथ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक शहर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे कोरडे पडलेले गोदावरी नदीचे पात्र आता पुन्हा पाण्याने भरून वाहू लागले आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी ढगफुटीसदृश अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्राजवळ जाणे टाळावे, पुराच्या पाण्यात उतरू नये आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार आपत्कालीन उपाययोजना राबवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
Published on: Jul 07, 2026 10:07 AM
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;