UPS : केंद्रानं मंजूरी दिलेली युनिफाईड पेन्शन योजना नेमकी काय? किती पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणार?
ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस म्हणजेच नवी पेन्शन योजना सुरू आहे. मात्र ती योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरलेली असताना केंद्र सरकारने आता यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजूरी दिली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम असं या नव्या पेन्शन योजनेचं नाव आहे. निवृत्ती पूर्वीच्या वेतनाची ५० टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे. तर २५ वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ मिळणार आहे. देशभरात जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, म्हणून विविध संघटना आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. केंद्रानं मंजूरी दिलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारसुद्धा हा निर्णय लागू करण्याची शक्यता आहे. किमान दहा वर्ष नोकरी करणाऱ्याला १० हजार पेन्शन मिळणार आहे. जर सरकारी नोकरी करत असतना पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पगाराच्या ६० टक्के इतकं पेन्शन देण्यात येणार आहे.
Published on: Aug 25, 2024 11:58 AM
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
