Central Railway : मुंबईकरांनो…आनंदाची बातमी, मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताय? आता तुमचा प्रवास होणार ‘कूल’
मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार आहे. कारण आता एसी लोकलच्या अतिरिक्त १४ फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. कारण वाढत्या उन्हाच्या कडाक्यात मध्य रेल्वेकडून एक ‘कूल’ निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या अतिरिक्त १४ फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर उद्यापासूनच एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे हैरान झालेल्या मुंबईकरांना उन्हाळ्यात एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून मध्य रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. यापूर्वी मध्य रेल्वे मार्गावर ६६ फेऱ्या सुरू होत्या मात्र त्यात आणखी १४ फेऱ्या वाढवल्यानंतर ही संख्या ८० वर पोहोचणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर अशा नव्याने १४ एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावित नव्या एसी लोकल फेऱ्या येत्या बुधवारपासून म्हणजेच १६ एप्रिलपासून धावणार असल्याचे सांगितले जात आहे.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...

