Gopichand Padalkar : मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंत पाटलांच्या कितव्या बायकोच…. फडणवीसांकडून तंबी तरीही पडळकरांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतरही गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य कायम ठेवले आहे. सांगलीतील दसरा मेळाव्यात त्यांनी जयंत पाटील राजारामबापूंची औलाद नाहीत हे बोलणे खरे असल्याचे म्हटले. पडळकरांनी टीकाकारांना प्रत्युत्तर देत, जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंबीनंतरही आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य कायम ठेवले आहे. सांगलीतील दसरा मेळाव्यात बोलताना पडळकर यांनी “जयंत पाटील राजारामबापूंची औलाद नाही असे बोललो होतो, हे खरे आहे. मी जे बोललो ते कधीच माघारी घेत नाही,” असे विधान केले. यापूर्वीच्या वक्तव्यावर ठाम राहत, पडळकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी “तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तर जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले ते सांगा,” असा सवाल केला. तसेच, आपल्याला गोप्या गोप्या असे संबोधणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. पडळकरांनी जयंत पाटील यांना थेट आव्हान देत, वेळ आणि स्थळ निश्चित केल्यास आपण भेटण्यास तयार असल्याचे सांगितले.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

