Gujarat Cabinet Reshuffle : गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे धडाधड राजीनामे, कारण नेमकं काय? भाजपची 2027 च्या निवडणुकांसाठी रणनीती!
गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने 2027 च्या निवडणुकांची तयारी म्हणून मोठ्या खांदेपालटाची योजना आखली आहे. यात महाराष्ट्राप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री नियुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची तसेच अमित शहांच्या उपस्थितीमुळे मोठे बदल अपेक्षित आहेत.
गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकूण 16 मंत्र्यांनी राजीनामे दिले असून, भाजपने 2027 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मोठ्या खांदेपालटाची योजना आखल्याचे बोलले जात आहे. नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बदलांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये सध्या 17 ऐवजी 27 मंत्र्यांना संधी दिली जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे हे बदल मोठे असतील असे अंदाज बांधले जात आहेत. भाजप गेल्या 30 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहे. त्यामुळे सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी आणि हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या मंत्र्यांना बदलण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदी कायम राहतील अशी शक्यता आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

