मला उद्या गोळ्या घालतील, गुणरत्न सदावर्ते यांचं खळबळजनक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
माझी हत्या जरी झाली तरी जयश्री पाटील लढतील आणि तुम्हाला न्याय मिळवून देतील, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गेल्या २३ वर्षापासून वनविभागाच्या अन्यायाला त्रस्त असलेल्या हजारो झोपडी जळीतग्रस्त रहिवाशांच्या मदतीला गुणरत्न सदावर्ते असणार असल्याचे त्यांचे म्हटले आहे.
मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : मी कष्टकरांचा आवाज म्हणून मला उद्या गोळ्या मारतील. तरी सुद्धा घाबरायचं नाही. माझी हत्या जरी झाली तरी जयश्री पाटील लढतील आणि तुम्हाला न्याय मिळवून देतील, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले. गेल्या २३ वर्षापासून वनविभागाच्या अन्यायाला त्रस्त असलेल्या हजारो झोपडी जळीतग्रस्त रहिवाशांच्या मदतीला गुणरत्न सदावर्ते असणार असल्याचे त्यांचे म्हटले आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व येथील आकृर्ली रोडच्या नांलदा बुध्द विहार परिसर, भिमनगर जळीतग्रस्त विभाग येथे महासंमेलन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते बोलत होते. ते म्हणाले ‘दामू नगरच्या वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या संवैधानिक लढा देत आहेत. त्याची चर्चा विधानसभेतही झाली. प्रवीण दरेकर यांना आवाहन करत आहे की, तुम्ही जनतेची आवाज बुलंद करा. नाहीतर मला करावा लागेल. मात्र दरेकर नक्कीच लोकांची बाजू मांडणार आहे असं मला वाटतंय’
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

