नोकरी गेल्यास जबाबदारी कोण घेणार? गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांचे बोलणे मनोरंजनापुरते मर्यादित असून, ते कायदा-सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत असे सदावर्ते म्हणाले. त्यांच्या चिथावणीमुळे एखाद्या कामगाराची नोकरी गेल्यास राज ठाकरे त्याची जबाबदारी घेतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राज ठाकरे हे कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत. राज ठाकरे यांचे बोलणे आता केवळ मनोरंजनाचे साधन बनले आहे, ज्यात मिमिक्रीशिवाय विशेष काही नाही, असे सदावर्ते म्हणाले.
जर राज ठाकरे यांच्या बोलण्यामुळे प्रभावित होऊन एखाद्या कष्टकऱ्याने किंवा दुकानात काम करणाऱ्या कामगाराने, मग तो हिंदी भाषिक असो, गुजराती भाषिक असो किंवा मराठी भाषिक असो, आपल्या मालकाविरुद्ध काहीतरी केले आणि त्यामुळे त्याची नोकरी गेली, तर राज ठाकरे त्या कामगाराची जबाबदारी घेणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नोकरी गमावलेल्या त्या कामगाराला राज ठाकरे पुन्हा नोकरी मिळवून देणार आहेत का,असेही सदावर्ते म्हणाले.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

