अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेचा प्रचाराचा काय आहे प्लॅन? पहा यासह 4 मिनिट 24 हेडलाईन्स

खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रावर पु्ण्यात पडसाद उमठले आहेत. या पत्राचे बॅनर पुण्यातील बालगंधर्व चौकात लावण्यात आले आहेत.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Oct 07, 2022 | 7:36 PM

खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे. शेवटच्या क्षणी आयोगाने उद्धव ठाकरे यांनी मुदत वाढ दिली. तर उद्या दुपारी 2 पर्यंत कागद पत्रं सादर करण्यास सांगितलं आहे. तर शिंदे गटाकडून शेवटच्या क्षणी कागद पत्र जमा करताना धांदल उडाल्याचे पहायला मिळाले. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवावर टीका करणे चुकीचे असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ठाकरे यांनी त्यांचे शब्द देखिल मागे घ्यावेत असेही ते म्हणाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रावर पु्ण्यात पडसाद उमठले आहेत. या पत्राचे बॅनर पुण्यातील बालगंधर्व चौकात लावण्यात आले आहेत. तर केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामनावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर सामनामधून काळा पैसा व्हाईट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर होऊ घातलेल्या अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना डोअर टू डोअर प्रचार करणार आहे. तर ऋतूजा लटके लढण्याची शक्यता आहे. तसेच अंधेरीतील हिंदू आणि मुस्लिम मते आपल्याकडे फिरण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें