Rajesh Tope LIVE | महाराष्ट्रात निर्बंध कायम; कोणतीही शिथिलता नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

व्यापाराच्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय होईल. व्यापारी वर्गाची वेळ मर्यादा आणि हॉटेल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनास्थिती आणि लसीकरणावर सविस्तर भाष्य केलं. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात केंद्राकडून सरकारकडून साडेचार कोटी लसी मिळण्याची शक्यता आहे, अशी राजेश टोपे यांनी माहिती दिली. कोव्हीड अनुषंगाने आज आढावा घेण्यात आला. संपूर्ण राज्यात लेव्हल 3 च्या अनुषंगाने नियम आखले आहेत. कोणत्याही पद्धतीची शिथिलता नाही. मुंबईत येणाऱ्यांनी 2 डोस घेतले असतील तर त्यांना मुंबईत विना आरटीपीसीआर शिवाय येता येणार नाही. व्यापाराच्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय होईल. व्यापारी वर्गाची वेळ मर्यादा आणि हॉटेल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI